Posts

Showing posts from July, 2021

वटपौर्णिमा

Image
  कधी कधी वाटते खरंच मी बायकोने माझ्यासाठी वटसावित्रीचे व्रत करावे ह्या लायक आहे का? का तीने उपवास करावा किंवा त्या महान वटवृक्षाची पुजा करावी. वटवृक्ष निर्हेतुकपणे भरभरून प्राणवायू देतो स्वतः उन्हाचे चटके सहन करून आपल्याला गर्द, शितल छाया देतो. पण माझ्याकडे असे काय माझे कतृत्त्व आहे? किंवा कुठे असले लक्षण आहे? असा कोणता मी सत्यवान आहे? माझ्यात कुठे एकपत्नी श्रीराम आहे? एक नवरा म्हणून खरंच मी ह्या सगळ्यासाठी पाईक आहे का…     ना मी सत्यवान की सतीचे वाण नाही एकपत्नी व्रतधारी प्रभू श्रीरामही नाही रावणाने पोखरलेले हे चित्त, ही काया कतृत्त्व काय तर फक्त जमवली माया का पुजावे कुणी मजसाठी असे तत्त्व मी कसला पवित्र, काय माझे कतृत्त्व का हि व्रतवैकल्ये अशी कुणी करावी अकारण माझ्यासाठी काया झिजवावी ह्या जन्मी जिच्या कतृत्त्वाची जाण नाही कशास तिने सात जन्माची गळ घालावी आधी त्या वटवृक्षाच्या सावलीसारखी माझ्या आचार विचारांची वृत्ती घडावी बेगडी पुरूषार्थाची आता किनार नको वृथा त्यात नर देहाची महानता नसावी मागणे हेच कुणी हे व्रत करण्यासाठी देवा त्यास आधी माझी पात्रता व्हावी मकरंद 🖋 २...