Posts

Showing posts from November, 2017

सावली

Image
सावली चालताना तुझ्यासवे मी न माझा राहतो बोलताना तुझ्याशी मग मी स्वतःला शोधतो कोण तू काय वाटे मला ते मनाला सांगतो समजावताना मनाला शब्द का ओथंबतो जागते असूया मनी पाहता तव कुणासवे मेघ दाटती सयींचे अन् भरूनी येती आसवे अस्तित्व तुझे का मला मृगजळासम भासते वाटते नियती कुटील माझ्यावरी का हासते चाललेलो मी सुखाने वाटेत तू आलीस का भेदूनी तटबंदी मनाची आत तू शिरलीस का सांग वाटेवरी पुढे मज साथ तू देशील का चालताना सोबतीने सावली तू होशिल का                                                                                      मकरंद 🖋🖋

ओली मैत्री सुकी मैत्री

Image
ओली मैत्री सुकी मैत्री दिवसभराची कामं आटोपून ऑफिस मधून निघालो होतो. कामांचा ताण कमी पण मानसिक शीण जाणवत होता. रस्त्याने निवांतपणे चालतंच निघालो होतो. तशी ही माझी रोजची सवय ज्या दिवशी मला अशी मानसिक मरगळ आलेली असते. त्यावेळी मी मस्त चालत चालत जातो. आजूबाजूच्या जगाकडे बघत बघत चालताना हळूच थकवा दूर पळून जातो. अचानक त्या दिवशी माझ्या पाठीवर कुणीतरी थाप मारली. मी थोडं दचकून मागे वळून बघितलं तर एक हसरा चेहरा माझ्याकडे ओळखीच्या नजरेने बघत होता. मी मात्र गोंधळून गेलो होतो कारण चेहऱ्याची ओळख पटत नव्हती. "ओळखलं का?" त्याचा उत्साही सूर "नाही. आपण मला ओळखता?" माझा गोंधळलेला चेहरा बघून त्याची कळी आणखीनच खुलली. मी मात्र अजूनही परिस्थितीचा आढावाच घेत होतो. त्याने मात्र एका आश्वस्त स्वरात विचारले "काय साहेब अजून नाही ओळखलं?" क्षणभर मला वाटलं हा 'आनंद' मधल्या राजेश खन्ना सारखी माझी विकेट तर घेत नाहीये ना? पण पुढच्या क्षणी माझी एकंदरीत अवस्था बघत त्यानेच कोंडी फोडली. "मी सुयश" आणि खाळ्ळकन मी एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि १२ वर्षापूर्वीचा काळ आठवला. तसे म...