सावली
सावली
चालताना तुझ्यासवे मी न माझा राहतोबोलताना तुझ्याशी मग मी स्वतःला शोधतो
कोण तू काय वाटे मला ते मनाला सांगतो
समजावताना मनाला शब्द का ओथंबतो
जागते असूया मनी पाहता तव कुणासवे
मेघ दाटती सयींचे अन् भरूनी येती आसवे
अस्तित्व तुझे का मला मृगजळासम भासते
वाटते नियती कुटील माझ्यावरी का हासते
चाललेलो मी सुखाने वाटेत तू आलीस का
भेदूनी तटबंदी मनाची आत तू शिरलीस का
सांग वाटेवरी पुढे मज साथ तू देशील का
चालताना सोबतीने सावली तू होशिल का
चाललेलो मी सुखाने वाटेत तू आलीस का
भेदूनी तटबंदी मनाची आत तू शिरलीस का
सांग वाटेवरी पुढे मज साथ तू देशील का
चालताना सोबतीने सावली तू होशिल का
मकरंद 🖋🖋
Comments
Post a Comment