खरंच सांग ना बाबा
ह्या कठीण परिस्थितीत बेशिस्त नागरिकांना नियंत्रण करण्यात कार्यरत असताना आपले काही पोलिस बंधू कोरोनामुळे दगावले. मग त्या मृत पोलिसाचे लेकरू जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा आपले काहीच उत्तरदायित्व नसेल? खरंच सांग ना बाबा खरंच सांग ना बाबा इतके गरजेचे होते का तुझे जाणे? सगळे घरात बसले असते तुलाही जावे लागले नसते खरंच त्यांचे बाहेर भटकणे तुझ्या जीवाहून मोलाचे होते? तूही माणूसच होतास ना रे धोका तुलाही होताच ना रे मग त्या बेशिस्त लोकांसाठी तुझ्याच जीवाशी खेळ का रे? बाबा तू मला शिस्त लावली मीही कायम धाकात राहिले त्यांच्या आईबाबांनी का नाही त्यांना शिस्तीचे धडे शिकवले? आज ते घरट्यात आपल्या मुलांसोबत सुखी असतील पण तुझ्या पोरक्या लेकराचे लाड बाबाविना कोण पुरविल? उद्या पैसे, पुरस्कार मिळतील चार दिवसात तुला विसरतील विचार त्यांना ह्याऐवजी एकदा पुन्हा माझे बाबा आणून देतील? मकरंद 🖊 http://makyachamala.blogspot.com/