Posts

Showing posts from December, 2017

शहीद: मेजर प्रफुल्ल मोहरकर

Image
माझे हे शब्द शत्रूच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना समर्पित… त्यादिवशी भारतमाता परत हमसाहमशी रडली असेल प्रफुल्लाच्या जाण्याने पुन्हा तिचे काळीज तुटले असेल जोरात टाहो फोडला असेल देऊ किती लेकरांचे बळी? माझ्या रक्षणासाठी अजून करू किती जीवांची होळी? रोज एका लेकराची माझ्या खुशाल आहुती चढतेय आपल्या पिलांना वाचवण्यात ही माय वांझोटी ठरतेय शेवटपर्यंत निकराने लढताना अखंड रक्ताने न्हाऊन निघाला पण त्याचा शेवटचा श्वासही सहकाऱ्यांसाठी अडकला त्याची अगतिक तळमळ बघून यमही असेल थांबला त्याचे प्राण घेऊन जाताना क्षणभर तोही असेल रडला आम्ही आपले खुशाल इकडे आनंदात लोळतोय वर्षाअखेरच्या पार्ट्यांमध्ये ग्लासात बर्फ घोळतोय पेपरातल्या मात्र बातम्या पाहून मन होते उद्विग्न हुतात्म्यांना एक रकाना अन् गाजते तारकांचे लग्न खरंच आमची चामडी आता गेंड्याची झालीय सीमेवर सैनिक मरतोय पण ...

खुरटलेलं झाड

Image
खुरटलेलं झाड "काय झालं सायेब. असं काहून बसलात?" विठूकाकांच्या ह्या प्रश्नाने वामनरावांची तंद्री भंग झाली. विठूकाका आले तेव्हा वामनराव एक टक त्या झाडाकडे न्याहाळत बसले होते. वामनराव शहरात उच्च पदावर कामाला होते. पण पूर्वीपासून त्यांना झाडाफुलांची प्रचंड आवड होती. म्हणूनच त्यांनी शहरापासून थोडे लांब हे फार्म हाऊस बांधले होते. जिकडे ते दर आठवड्याला आवर्जून भेट देत. झाडांच्या सोबतीत त्यांचे मन छान रमायचे. तसे ते व्यवसायाने इंजिनिअर असले तरी वनस्पतीशास्त्राचे गाढे अभ्यासक. त्यांचा मुळी छंदच होता बागकाम. विठूकाका म्हणजे त्यांच्या फार्म हाऊसची काळजी घेणारे माळी. पण दोघांमध्ये मालक नोकर हे नातं कधी आलंच नाही. कारण विठूकाकांनाही बागकामाची मनापासून आवड होती. त्यामुळे एक अभ्यासक ज्याला आवड होती पण सवड नव्हती आणि एक उपासक ज्याला आवड होती पण आवड जोपासना परवडणारी नव्हती. त्यामुळे दोघांचे ही अगदी छान सुर जुळले होते. पण आजचे निमित्त थोडे वेगळेच होते. "विठूदादा किती छान बहरवलंत हो ह्या झाडाला" वामनराव खुषीत उद्गारले. काही दिवसांपूर्वीचा दृश्यपटल त्यांच्या नजरेसमोरून तरळला. स...