Posts

Showing posts from January, 2018

माझी माय माझ्यासाठी झंझट नाय

Image
आज सहज बोलताना एकजण म्हणाला की मराठी लिहिणे म्हणजे एक झंझट आहे म्हणून मी त्या भानगडीतच पडत नाही.  खरंच ही गोष्ट माझ्या मनाला छेदून गेली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना हे शब्द उतरले… माझी माय माझ्यासाठी झंझट नाय म्हातारी झालीय, आजारी हाय थोडी थकलीय, थोडी खंगलीय इतरांच्या तुलनेनं साधी हाय पर कशीही असली तरी बी माझी माय माझ्यासाठी झंझट नाय… पूर्वीची शिरमंती ऱ्हायली न्हाय पैशाने थोडी गरीबीत हाय अलंकारांनी मढलेली हाय पर कशीही असली तरी बी माझी माय माझ्यासाठी झंझट नाय… मोठेपणानं ती मिरवत न्हाय लाचारपन तिच्या रगतात न्हाय आशेनं कुनाकडं मागनार न्हाय पर कशीही असली तरी बी माझी माय माझ्यासाठी झंझट नाय… नावानं ज्यानी भरल्या तिजोऱ्या त्या सग्याना तिची पडलेली न्हाय पर सेवेत तिच्या मी हटनार न्हाय ...

मैत्री की राजकारण

Image
मैत्री की राजकारण आज का असे वाटते जातीचा रंग सच्चा आहे आयुष्यातल्या मैत्रीचा धागा मात्र कच्चा आहे मुंजीला जेवलो तो बर्व्या आज ब्राम्हण आहे भंडारा लावून जेजुरी चढलो तो सुर्व्या मराठा आहे काटेरी निवडुंग कांबळ्याने सोललेला ऊस खाल्ला तो दलित आहे खरंच का हेच आमच्या मैत्रीचे फलित आहे लहानपणी खेळताना कधीच नव्हते कळले कोणालाही लागले तरीही थुंकी लावून चोळले चिखल असो वा माती नखशिखांत अंगभर लोळले मैत्रीचे सारे नियम बिनदिक्कतपणे पाळले बर्व्याचे बाबा गंभीर असताना रक्तदान केले सुर्व्याने दिलेल्या रक्ताने बर्व्याचे बाबा वाचले कांबळ्याने आणलेल्या औषधाचे पैसे कुणी दिले त्यावेळी हे हिशोब कुणीच नाही मागितले बाबा वाचले म्हणून बर्व्याने देवाला पेढे ठेवले पण पहिले दोन पेढे मैत्रीच्या देवांना दिले अश्रु भरल्या डोळ्यांनी छातीशी कवटाळले ...