ब्रँडिंग
पूर्वी १० * १० च्या खोलीत सगळे मिळून मिसळून, खेळीमेळीने आणि एकजूटीने एकत्र रहात होते. पण कालांतराने जसजसे उत्पन्न वाढते तसतसे १, २, ३, ४ BHK ह्यांची गरज वाढतच जातेय. प्रत्येकाला वैयक्तिक जागेची गरज वाटू लागली आहे. दुसऱ्याची साधी उपस्थिती ही खटकतेय, वैयक्तिक आयुष्यात लुडबूड वाटायला लागली आहे. जेवढी आपली जागा वाढतेय. तेवढाच नात्यातला दुरावा वाढत चालला आहे. पूर्वी आपल्या संस्कृतीची असलेली ओळख आपल्यात असणारी नात्यांची घट्ट वीण दिवसेंदिवस उसवते आहे. पूर्वी त्या छोट्याशा खोलीत सगळे एकमेकांना समजून घेण्यासाठी उपलब्ध होते. आता वैयक्तिक बेडरूममध्ये सगळे आपापल्या रूममध्ये एकटे जगताना दिसतात. सगळे आपापल्या विवंचना घेऊन स्वतःला कोंडून घेतात. पर्यायाने एकाकी पडतात म्हणून मग राहत्या घरातही बंद बेडरूममध्ये आत्महत्या होतात. त्यात कारणे काय तर कर्जाचे हफ्ते थकले, व्यवसायात नुकसान, एखाद्या नात्यातील अपयश, आजार किंवा एकाकीपण. म्हणून मग प्रश्न पडायला लागतो आपणही तेच आपल्या गरजाही त्याच आहेत मग नक्की बदलले काय आहे… मध्यमवर्गीयांमध्ये पैसा आला आणि सुखाचेही ट्रेंडिंग झाले आपल्या साध...