कमवले जे गमवले
आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते. आपण काहीतरी सिद्ध करण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करून झुंज देतो. पण तसे करत नसताना नकळत, गैरसमजुतीने काही बंध दुखावले जातात. आपण यशस्वी तर होतो पण त्याची किंमत मोजावी लागते आणि मग मिळालेल्या यशाचा आनंद ही नीरस, बेचव वाटू लागतो…
कमवले जे गमवले
नको म्हणत असता नियतीने
का फुकाचा खेळ हा मांडला
हरपूनी देह पणाला लावला
जिंकलो मी बाजी तरीही काय
एकटेपणाचा शाप आता लाभला
चढवला ताज काटेरी शिरी
परी सारा देह माझा फाळला
कमवले जे गमवले ते सांगू कुणा
सोबतीला कोणी न माझा राहिला
सांगु कशी व्यथा मनीच्या कुणा
खोलवर घाव जिव्हारी लागला
सुखात होतो झोपडीत माझ्या
मज नको हा चंद्रमौळी बंगला
मकरंद 🖋
www.makyachamala.blogspot.com/

Comments
Post a Comment