Posts

Showing posts from February, 2018

कमवले जे गमवले

Image
आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते. आपण काहीतरी सिद्ध करण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करून झुंज देतो. पण तसे करत नसताना नकळत, गैरसमजुतीने काही बंध दुखावले जातात. आपण यशस्वी तर होतो पण त्याची किंमत मोजावी लागते आणि मग मिळालेल्या यशाचा आनंद ही नीरस, बेचव वाटू लागतो…   कमवले जे गमवले नको म्हणत असता नियतीने का फुकाचा खेळ हा मांडला झोकूनी दिले सर्वस्व माझे हरपूनी देह पणाला लावला जिंकलो मी बाजी तरीही काय एकटेपणाचा शाप आता लाभला चढवला ताज काटेरी शिरी परी सारा देह माझा फाळला कमवले जे गमवले ते सांगू कुणा सोबतीला कोणी न माझा राहिला सांगु कशी व्यथा मनीच्या कुणा खोलवर घाव जिव्हारी लागला सुखात होतो झोपडीत माझ्या मज नको हा चंद्रमौळी बंगला मकरंद 🖋   www.makyachamala.blogspot.com/

एकच दिवस प्रेमाचा

Image
मला सांगा खरंच का हो प्रेम असं एकाच दिवसात मांडता येतं आमचं प्रेम मोगऱ्याच्या एका गजऱ्यात खुलतं पण ह्यांचं प्रेम अख्खा पुष्पगुच्छ दिला तरी पन्नासाला एक गुलाब कमी का म्हणून रूसतं… मला सांगा खरंच का हो प्रेम असं एकाच दिवसात मांडता येतं आमचं प्रेम चौपाटीच्या वाळूतही सहज उमटतं पण ह्यांचं प्रेम मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघून महागड्या हॉटेलमध्ये पार्टी करून फिस्कटतं… मला सांगा खरंच का हो प्रेम असं एकाच दिवसात मांडता येतं आमचं प्रेम नजरेने बोलून काळजात उतरतं पण ह्यांचं प्रेम कपड्यांच्या मर्यादा पार झाल्यावर ही त्या पलीकडच्या सुखासाठी आसुसतं… मला सांगा खरंच का हो प्रेम असं एकाच दिवसात मांडता येतं आमचं प्रेम मायेच्या चार शब्दांत सुखावतं पण ह्यांचं व्हॅलेंटाईन सुखासीनतेच्या दिखाव्यात फुलून पैशाच्या उधळपट्टीत विलासतं… मकरंद 🖋 www.makyachamalablogspot.com

जगण्याचा श्वास…शिव्यांङमय

Image
                                              जगण्याचा श्वास…शिव्यांङमय "हरामखोर लेकाचे" आरोळी ठोकतच मी केस पुसत बाथरूमच्या बाहेर पडलो. टॉवेल भिरकावून मग देवासमोर हात जोडून उभा राहिलो. वळून परत सुरू करणार तेवढ्यात जणू काही झालंच नाही अशाप्रकारे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता.. "काय झालंय सकाळी सकाळी सगळ्यांचा कुळाचार आणि उद्धार करायला?" एक पाठमोरा निर्विकार प्रश्न आला. "अगं पाणी कमी येतंय. रात्रभर झोपा काढतात. हे नालायक" "उगाच आरडाओरड, शिवीगाळ करू नका. गेलाय तो पंप चालू करायला आणि किती शिव्या घालता हो. मुलगी आता मोठी झालीय. काय संस्कार घेणारे ती" "ह्यात शिव्या होत्या? कुठल्या? कधी?" माझे भोळे कुतूहल "नाहीतर काय नामस्मरण करत होता?" ज्या वेगाने आणि आवेगाने हा प्रतिप्रश्न आला. तेव्हा मात्र माझी भंबेरी उडाली. कारण ही एक ठिणगी होऊ शकते हे एवढ्या...