पालखी




पालखी
       
चला चाललो पालखी निघाली
न देह उरला न सावली राहिली
सोडूनी स्वप्न मागे जी पाहिली
संथ पाऊले परतीला निघाली

हृदयगती स्पंदनांची मंदावली
धाप थकल्या जीवाला लागली
आस श्वासात अजूनी रेंगाळली
धरणी रक्ती भिजूनी गंधाळली

पापणीही आता भार जाहली
भागली नयने निद्रेत पेंगुळली
परी खंत मनाशी एक राहिली
काळाने अकाळी वेळ साधली

धुरा सैनिकाची जरी वाहिली
सोडले सोयरे नाती रूंदावली
मायबाप सखेची साथ सोडली
परी पिल्लांमध्ये आस गुंतली

सांगाल भेटता माझी बाहुली?
शोधू नकोस बाबाची सावली
अंगणी पणती असेल पेटली
तिथून बघेन मी तुला सानुली

*मकरंद* 🖋

http://makyachamala.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

खरंच सांग ना बाबा

झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया

ब्रँडिंग